मुंबई, १८ मे २०२३, प्रतिनिधी : अखेर सर्वोच न्यायालयानं महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. ता बैलगाडा शर्यतींचा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. तामिळनाडूतील जल्लिकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना अभय दिलं आहे.
तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संबंधित कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. सुनावणीनंतर घटनापीठानं याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर तामिळनाडूमधील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी (१८ मे) रोजी एकत्रितपणे निकाल देणार आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतीचं भवितव्य आज ठरणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडं बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागलं होतं.
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीबाबत सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सर्वांच्या नजरा न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते. सलग तीन आठवडे चाललेल्या या सुनावणीमध्ये बैलगाडा शर्यतींना विरोध करणाऱ्या एकूण १५ याचिकांचा समावेश होता. तर बैलगाडा शर्यतीचे समर्थन करणाऱ्यांमध्ये तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब या राज्यांचा तसेच केंद्र शासन व ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचा समावेश होता.