काही ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे. तर, कापसाबाबत दरवाढ मिळत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रीच थांबवली आहे.
मागील वर्षी कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा देखील कापसाला तेवढाच भाव मिळेल या आशेने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती. कापूस निघण्यास जेव्हा सुरुवात झाली. त्यावेळी कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर होता. मात्र तो आता हळूहळू कमी होत असून ८ हजार रुपये पर्यंत येऊन ठेपला आहे. मागील वर्षी कापसाला चांगले भाव मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस ठेवला होता. मात्र आता कापसाचे भाव ८ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनी आता कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राजकीय पक्ष आपल्याच भांडनात व्यस्त आहे. सरकार आणि नेत्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही असा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाव मिळत नसल्याने स्वामिनाथन आयोग लागू व्हावा अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली.