तेजस मोहतुरे, प्रतिनिधी
नागपूर :आज 21 नोव्हेबंर रोजी सकाळीच्या सुमारास मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नागपूरमधील खापरखेडा मधील जयभोले नगरात कपडे वळविण्यासाठी लोखंडी तारेवर कपडे टाकताना माय लेकास करंट लागून मृत्यू झाल्याची घटना आहे. महिलेने नाव निर्मला उत्तम सोनटक्के असून त्या वयवर्षे 51 होत्या. तर मृतक मुलाचे नाव लोकेश उत्तम सोनटक्के वयवर्षे 31 असे आहे. मृतक लोकेश हा भानेगाव कोळसा खाणीत खाजगी कंपनीत कार्यरत होता. लोकेश कामावरून घरी परतला रात्रपाळी झाल्यामूळे लोकेश झोपला होता.
यावेळी लोकेशची आई वायर वर कपडे वाळत टाकत असताना तारेच्या वरच्या भागाला जिवंत तार होती. अचानक कपडे वाळवत असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह आला आणि निर्मला यांना जोरदार करंट लागला. त्यांना करंट लागताच त्यांनी जोरात हंबरडा फोडला असता झोपेत असलेल्या लोकेशने आईच्या दिशेने धाव घेतली. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात लोकेशला देखील करंट लागला. सदर घटनेत माय लेकाचा घटना स्थळावर मृत्यू झाला असून खापरखेडा परिसरात या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.