Chembur Tanker Blast News : मुंबई हादरली! केमिकल टँकरचा भीषण स्फोट, स्फोटाच्या धक्क्याने घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या

मुंबईतील चेंबूर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूरच्या जिजामाता नगर इथे असलेल्या मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टॅंकरचा ब्लास्ट झाला आहे.

Chembur Tanker Blast News : मुंबई हादरली! केमिकल टँकरचा भीषण स्फोट, स्फोटाच्या धक्क्याने घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या

मुंबईतील चेंबूर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूरच्या जिजामाता नगर इथे असलेल्या मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टॅंकरचा ब्लास्ट झाला आहे. ब्लास्टमध्ये ड्रायव्हर आणि वेल्डर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा- Mumbai Local News : धक्कादायक! लोकलमध्ये एक व्यक्ती नशा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चेंबूरमधील जिजामातानगर या भागात टँकरच्या दुरुस्तीचे काम केले जाते. दुपारच्या सुमारास एका टँकरच्या टाकीचं काम सुरू होतं. या टँकरचे वेल्डिंग करण्यासाठी हा टँकर आला होता. याचे वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक या टँकरमध्ये ब्लास्ट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, टँकरचे दोन तुकडे झाले.

तसेच स्फोटाच्या आवाजाची तीव्रता इतकी मोठी होती की, या ब्लास्टमुळे आसपासचा इमारतीच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number