कोकणातील विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पक्षात कोणाला स्थान द्यावे किंवा नाही हा संपूर्ण पक्षश्रेष्ठींचा आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय असणार आहे. त्यामुळे लवकरच भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे भाजपा प्रेदश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खुलासा केला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करत आहेत.
असाच मोठा खुलासा भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे.
कोकणातील पाच ते सहा आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली आहे.
पक्षात प्रवेश करण्याऱ्यांपैकी कोणाला पक्षात स्थान द्यावे की नाही हा संपूर्ण पक्षश्रेष्ठींचा निर्णय असणार आहे.
त्याचबरोबर भाजपामध्ये अजून मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे.