‘मग दुर्दैवी मृतकांना शरदवासी म्हणायचे ?’

बुलढाणा, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावर (१ जुलै) शनिवारी पहाटे अपघातात एकूण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालेलं आहे. समृद्धी महामार्गावर मृत्यू झालेल्यांना लोक ‘देवेंद्रवासी’ झाला असं म्हणतात, अशी टीका पवारांनी केली होती. त्याला भाजपने उत्तर दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

‘मग दुर्दैवी मृतकांना शरदवासी म्हणायचे ?’

बुलढाणा, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावर (१ जुलै) शनिवारी पहाटे अपघातात एकूण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालेलं आहे. समृद्धी महामार्गावर मृत्यू झालेल्यांना लोक ‘देवेंद्रवासी’ झाला असं म्हणतात, अशी टीका पवारांनी केली होती. त्याला भाजपने उत्तर दिलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,
समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्रजींनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत. वेळेची बचत होत आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले की, देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो, असे सगळे सर्वांना माहीत असूनही, देवेंद्रजींचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी आज शरद पवार यांनी गाठली आहे. समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना कळस गाठला. ‘आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.’ असं पवार म्हणाले. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले, पवार गोवारी विसरले, पवार मावळचा गोळीबार विसरले, पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले. हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले, तुमच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शरदवासी’ म्हणायचे का? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number