जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्यातून मुंबईतील नद्यांच्य़ा पुनरुज्जीवनसाठी मुंबईकरांना आवाहन केल आसल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समार आला होता. यासाठी एक संगीत-चित्रफीत तयार करण्यात आलीय. यामध्ये अमृता फडणवीस या गाण्यातून मुंबईकरांमध्ये जनजागृती निर्माण करताना दिसत आहेत.
यावेळी अमृता फडणवीसांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारही दिसत आहेत. अमृता फडणवीस यांच्यासोबत सोनू निगमनंही पार्श्वगायन केल आहे.
त्यानंतर सोशल मीडियावर जेव्हा हे गाण प्रदर्शीत झालं तेव्हा या गाण्याची खिल्ली देखील भरपूर प्रमाणात उडवीण्यात आली होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या व्हिडीओत लिप्सींग करताना अनेकांनी त्याच्या तुलना देखील केल्या. मात्र, या व्हिडीओचा महाराष्ट्र शासनाशी काहीही संबंध नसल्याची माहिती आता समोर आली आहे.
त्यामुळे आता अनेकांचे जे भ्रम होते की हा व्हिडीओ मुंबईतील नद्यांच्य़ा पुनरुज्जीवनसाठी मुंबईकरांना आवाहन करणारा होता तो आता दूर झाला आहे.