ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात चोरी

अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडक्यांचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. इतकंच नव्हे तर संपूर्ण कार्यलयामधील स्लायडिंग खिडक्यासुद्धा उचकटून काढल्या आणि कार्यालयातील महागडा एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आदींसह इतर वस्तू असा अंदाजे साडेचार लाख रुपयांची सामग्री […]

ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात चोरी

अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडक्यांचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. इतकंच नव्हे तर संपूर्ण कार्यलयामधील स्लायडिंग खिडक्यासुद्धा उचकटून काढल्या आणि कार्यालयातील महागडा एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आदींसह इतर वस्तू असा अंदाजे साडेचार लाख रुपयांची सामग्री घेऊन फरार झाला आहे.

दरम्यान या प्रकरणी ही चोरी डायमंड गँग नावाच्या एका टोळीने केल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. कोविड काळनंतर बंद पडलेल्या कार्यालयांना ही टोळी लक्ष करते आणि त्यातील माल चोरुन भंगारमध्ये विकते. आपल्याही बंद असणाऱ्या या कार्यालयात याच डायमंड गॅंगने चोरी केली असून मालही भंगार दुकानात विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र डायमंड गँग वगैरे सक्रिय असल्याच्या सदावर्ते यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तरी सुद्धा याबाबतीत अधिक चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वागळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number