योगी सरकारने अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने उत्तरप्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्डच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. शैक्षणिक सत्र 2023-24मध्ये, इयत्ता बारावीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघल प्रकरण काढूण टाकण्यात आले आहे. तसेच अकरावीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत. 2023-24 या शैक्षणिक सत्रात इंटरमिजिएटमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय इतिहासाचे काही […]

योगी सरकारने अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने उत्तरप्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्डच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. शैक्षणिक सत्र 2023-24मध्ये, इयत्ता बारावीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघल प्रकरण काढूण टाकण्यात आले आहे. तसेच अकरावीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत.

2023-24 या शैक्षणिक सत्रात इंटरमिजिएटमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय इतिहासाचे काही विषय – || मधून शासक आणि मुघल दरबार काढण्यात आला आहे. तसेच नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचं वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटवण्यात आले आहेत.

योगी सरकारचा शैक्षणिक क्षेत्रातील हा बदल 2023-24पासून लागू होणार आहे. इतिहासाच्या पुस्तकाशिवाय इतर विषयांतही हा बदल दिसून आला आहे. बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.

यापूर्वी, बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहास-|| मध्ये राज्यकर्ते आणि मुघल दरबाराचे प्रकरण होते, जे आता अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहे. तर अकरावीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number