वेस्ट इंडिजविना खेळला जाणार विश्वचषक

वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात वेस्ट इंडिजचा स्कॉटलँडने ७ विकेट्सनी पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफायर फेरीच्या सुपर सिक्समधून बाहेर पडला आहे. पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या संघाशिवाय वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. आता भारतात होणाऱ्या यंदाच्या वनडे विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ दिसणार नाही.वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात […]

वेस्ट इंडिजविना खेळला जाणार विश्वचषक

वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात वेस्ट इंडिजचा स्कॉटलँडने ७ विकेट्सनी पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफायर फेरीच्या सुपर सिक्समधून बाहेर पडला आहे. पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या संघाशिवाय वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. आता भारतात होणाऱ्या यंदाच्या वनडे विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ दिसणार नाही.वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात वेस्ट इंडिजचा स्कॉटलँडने ७ विकेट्सनी पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफायर फेरीच्या सुपर सिक्समधून बाहेर पडला आहे. पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या संघाशिवाय वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ साली वर्ल्डकप जिंकला होता.

भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण वेस्ट इंडिजचा संघ मात्र आता भारतामधील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सध्याच्या घडीला विश्वचषकासाठी पात्रता फेरी सुरु आहे. या फेरीत वेस्ट इंडिजला यापूर्वी झिम्बाम्वेच्या संघाने मोठा धक्का दिला होता. पण आता तर क्रिकेट विश्वात लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे आणि या पराभवानंतर ते आता भारतामधील होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये स्कॉटलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला ४३.१ षटकांत १८१ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात स्कॉटलंडने ४३.३ षटकात ३ विकेट गमावत १८५ धावा करून सामना जिंकला. या विजयासह स्कॉटलंडचे सुपर सिक्समधील तीन सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिज ३ सामन्यांत ३ पराभवानंतर पाचव्या स्थानावर आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number