विधान परिषदेची आगामी निवडणूक, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नसून हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली असून हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर येथे घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होता. मात्र राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे.