विधान परिषदेची आगामी निवडणूक, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नसून हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली असून हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर येथे घेण्यात येणार यावरही निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट तसेच विधान परिषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला पार पडणार आहे. त्यामुळेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.