HSC Result 2026 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार निकाल; ‘असा’ तपासा तुमचा स्कोअर

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे घोषित केला जाणार आहे.

HSC Result 2026 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार निकाल; ‘असा’ तपासा तुमचा स्कोअर

HSC Result 2026 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे घोषित केला जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी यासंदर्भात शिक्कामोर्तब केले आहे.

निकाल कधी आणि कुठे जाहीर होणार?
राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांचा (पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण) एकत्रित निकाल उद्या सकाळी 11:00 वाजता पुण्यात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल. त्यानंतर, दुपारी 1:00 वाजल्यापासून सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर वैयक्तिक निकाल पाहता येईल.

येथे पाहता येईल निकाल (अधिकृत वेबसाईट्स):
निकाल पाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही लिंकचा वापर करा:
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in

हेही वाचा – Maharashtra School Result Rules 2026 : 1 मे रोजी निकाल; शालेय निकालाचा नवा पॅटर्न! आता प्रगतीपुस्तकासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार; आणि…

निकाल पाहण्याची सोपी प्रक्रिया (Step-by-Step):
ऑनलाईन निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील पायऱ्या फॉलो कराव्यात:

सर्वात आधी वर दिलेल्या कोणत्याही एका अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

मुख्य पृष्ठावर (Homepage) असलेल्या 'HSC Examination Result 2026' या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचा आसन क्रमांक (Roll Number) अचूक भरा.

त्यानंतर तुमच्या आईचे नाव (पहिले नाव) दिलेल्या रकान्यात टाईप करा.

माहिती भरून झाल्यावर 'View Result' या बटणावर क्लिक करा.

तुमची गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल, ती पुढील संदर्भासाठी डाऊनलोड किंवा प्रिंट करून ठेवा.

मंडळाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, निकाल पाहण्यासाठी केवळ शासनमान्य आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number