राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तर, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या राजीनाम्याल विरोध दर्शवला. आणि अखेर शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. या सर्व घडामोडींवर दैनिक सामना या वर्तमानपत्राच्या अग्रेलाखातून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला.
पक्षातील वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले असल्याची टीका शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे. दरम्यान, या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव गटाची भूमिका मविआच्या ऐक्याला पोषक असेल, अशी प्रतिक्रिया सामनाच्या अग्रलेखावर शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार असे समाकरण आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि आजवर टिकवला आहे. मात्र, शरद पवारांच्या नंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. पवार यांच्या शब्दाला राजकारणात मान आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेणारा वारस शरद पवार निर्माण करू शकले नाहीत. यामध्ये शरद पवार अपयशी ठरले, असं म्हणत सामना दैनिक वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला.
तसेच, शरद पवारांनी पक्ष पुढे नेणारा वारस निर्माण केला नाही आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रे, पक्ष चांगलाच हादरला. यापुढे आपले कसे होणार, अशा पेचात सर्व राष्ट्रवादी नेते पडले. तर, शरद पवारांनी राजीनामा पुन्हा मागे घेण्यासाठी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवून रस्त्यावर उतरले. त्यामुळे अखेर शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा लागला, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.