कांद्याला सध्या सरासरी ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून केलेला उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील निमोण येथिल शेतकरी भाऊसाहेब देवरे यांनी आपल्या एक एकर काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवत कांदा नष्ट केलाय.आधिच भाव नाही त्यातच काढणी आणि वाहतूकीचा खर्च वसूल होणार नसल्याने कांद्यावर ट्रॅक्टर फिरवत नाराजी व्यक्त केली असून सरकारने कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी देवरे व्यक्त केलीय.
लेट खरीप रांगडा लाल कांद्याचे दरात सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे एकीकडे उत्पादकता कमी तर दुसरीकडे केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा साठवलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरश पाणी आलं आहे.