सातारा : सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यावर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल चार हजार रुपयांवर द्यावी. यासाठी २१ आॅक्टोबरपर्यंत दर जाहीर करावा. अन्यथा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. त्यासाठी संघर्ष अटळ आहे, अशी भूमिकाl शेतकरी संघटनांनी बैठकीत घेतली.