शिकक्षकांसह विद्यार्थ्यांनी केली शेती

मुंबई, २० जुलै २०२३, प्रतिनिधी : सध्या भात लावणीची कामे सुरू आहेत. ही सर्व माहिती विद्यार्थी पुस्तकातुन अभ्यासतात. याच भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा यासाठी सिंधुदुर्गातील वामनराव महाडिक या महाविद्यालयाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.  शाळेतील मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीची कामे कशा पद्धतीने केली जातात, याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी “एक […]

शिकक्षकांसह विद्यार्थ्यांनी केली शेती

मुंबई, २० जुलै २०२३, प्रतिनिधी : सध्या भात लावणीची कामे सुरू आहेत. ही सर्व माहिती विद्यार्थी पुस्तकातुन अभ्यासतात. याच भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा यासाठी सिंधुदुर्गातील वामनराव महाडिक या महाविद्यालयाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.  शाळेतील मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीची कामे कशा पद्धतीने केली जातात, याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी “एक दिवस बळीराजासाठी” हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

सिंधुदुर्गातील वामनराव महाडिक महाविदयालयाने “एक दिवस बळीराजासाठी” हा उपक्रम साजरा केला. त्यावेळी देवेंद्र तळेकर यांच्या शेतामध्ये महाविद्यालयीन मुलांनी शेतीची प्रात्याक्षिके पाहिली केली. स्वत: प्रात्यक्षिक कार्यामध्ये सहभागी झाले. मुलांना आजचा शेतावरचा दिवस अत्यंत जिव्हाळ्याचा वाटला. विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणारा अनोखा उपक्रम “एक दिवस बळीराजासाठी” शेतीपासून दूर जाणारी युवा पिढी शेतीकडे वळावी, त्यांना शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, शेतीतील नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

याचबरोबर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी शेती कामाची प्रात्याक्षिके पाहिली केली. स्वत: प्रात्यक्षिक कार्यामध्ये सहभागी होऊन लावणी, बांध बांधणे, तरवा काढणे अशी कामे केली. तसेच विद्यार्थयांनी देखील या प्रात्यक्षिकाचा आनंद लुटला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number