बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आज चक्क एसटी महामंडळाच्या बसेस घाटकोपर बस आगारात दाखल झाल्या आहेत. मात्र या संपामुळे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांची मुजुरी वाढलेली पाहायला मिळते यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. […]

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आज चक्क एसटी महामंडळाच्या बसेस घाटकोपर बस आगारात दाखल झाल्या आहेत. मात्र या संपामुळे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांची मुजुरी वाढलेली पाहायला मिळते यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. मागील चार दिवसांपासून हा संप सुरु आहे. सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटका बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान समान अधिकार मिळत नाही, तोयपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळं प्रवाशांचे मोठे हाल होतायेत. शनिवारी संपाबाबत प्रशासन व कर्मचारी यांच्यात बैठक होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी संपाची घेतली दखल

सध्या आझाद मैदान येथे ९ हजार कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळं आझाद मैदानातील संपची दाखल शासनाने घेतली आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन व मुंबई महानगरपालिका (बेस्ट) उपक्रम मधील कंत्राटी कामगार त्यांच्या काही मागण्यांसाठी आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित दखल घेऊन त्यांच्या तर्फे शिवसेना सचिव व प्रवक्ते आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष या नात्याने किरण पावसकर यांना प्रत्यक्ष भेट घेण्यास सांगून त्यांच्या समस्या व मागण्या समजावून घेतल्या. व यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदनातून योग्य तो तोडगा काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासित केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number