क्रिसनच्या तुरुंगवासाची कहाणी

मुंबई, २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : ‘सडक २’ आणि ‘बाटला हाउस’ सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री क्रिसन परेरा हिला अंमली पदार्थांच्या तस्करीत नाव आल्यामुळे दुबई येथील शाहजहा तुरुंगात कैद करण्यात आले होते. आता तिची या प्रकरणातून अखेर सुटका झाली. अभिनेत्री क्रिसन परेरा परदेशात तब्बल २६ दिवस कैद होती. याविषयी तिने एक पत्र लिहिले आहे. याला पात्रात तिने […]

क्रिसनच्या तुरुंगवासाची कहाणी

मुंबई, २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : ‘सडक २’ आणि ‘बाटला हाउस’ सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री क्रिसन परेरा हिला अंमली पदार्थांच्या तस्करीत नाव आल्यामुळे दुबई येथील शाहजहा तुरुंगात कैद करण्यात आले होते. आता तिची या प्रकरणातून अखेर सुटका झाली.

अभिनेत्री क्रिसन परेरा परदेशात तब्बल २६ दिवस कैद होती. याविषयी तिने एक पत्र लिहिले आहे. याला पात्रात तिने तिच्या या २६ दिवसांची कहाणी सांगितली आहे. या भयावह कहाणीची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

या पत्रात क्रिसनने लिहिले कि,‘हा काळ माझ्यासाठी कठीण होता. तुरुंगात साधा पेन आणि पेपर मिळवण्यासाठी मला ३ आठवडे आणि ५ दिवस लागले. त्यावेळेस मला सर्फने केस धुवावे लागायचे. बऱ्याचदा मी टॉयलेटमधील पाण्यापासून कॉफी बनवली. मनोरंजनासाठी मी आपले भारतीय चित्रपट पाहायचे. त्याकाळात हे चित्रपट आणि त्यातील कुटुंबे पाहून माझ्या ओठांवर हसू यायचे. त्यामुळे मला मी भारतीय असलायचा गर्व आहे.विशेष म्हणजे मी खूप भाग्यवान आहे की मी या महान सिनेविश्वाची भाग आहे.”पुढे ती म्हणाली,‘मी या जाळ्यात अडकले गेले होते. या काळात ज्यांनी माझी साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभे राहिले अश्या सगळ्यांचे खूप खूप आभार.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number