मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर इथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला उद्देशून एक विधान केलं होतं. हे विधान सिंधी समाजाचा अपमान करणारं असल्याचं सांगत यावर सिंधी समाजानं आक्षेप घेतला. तसेच याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजानं कोपरी इथं एकत्र येत आव्हाडांचा निषेध नोंदवला.
तसेच जोपर्यंत तो समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत विविध संविधानिक मार्गानं त्यांचा निषेध नोंदवला जाईल, अशी भूमिका घेतली.त्यात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानुसार, त्यांच्यावर गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे अशा प्रकरणात भादंवि १५३ अ, १५३ ब, २९५ अ आणि २९८ कलमान्वन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सिंधी समाजातील एका बदमाशाने उल्हासनगरला जाऊन माझ्या पक्षाचे नेते श्री. मी पप्पू कलानींशी बोलतो आणि त्यांची स्तुती करतो, म्हणून मला बदनाम करण्यासाठी माझ्या भाषणाचा मॉर्फ व्हिडिओ बनवला आणि तो संपूर्ण सिंधी समाजात प्रसारित केला. आव्हाड म्हणाले, मी आता मूळ व्हिडिओ अपलोड करत आहे. दोन दिवस चुकीचे व्हिडिओ दाखवून सिंधी समाजाला कोण भडकवत आहे? हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. माझ्यावर खोटी एफआयआरही करण्यात आली. आता मला सरकारला विचारायचे आहे की मॉर्फ व्हिडिओ समोर आला आहे आणि मूळ व्हिडिओ देखील समोर आला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल केला. हा सर्व बालिशपणा आहे. तोंडावर आपटले आता काय बोलणार. माझी काहीही मागणी नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, जे मंत्री बालिशपणा करीत आहेत त्यांना सांगेल की, आम्हीही राजकारणात साठ वर्षे झाली आहे. आम्ही चाळीस चाळीस वर्षे राजकारणात आहे. तुमच्या आधी मंत्री,आमदार झालो आहोत. एवढे छोटे होऊ नका, माझा एप्रिल २०२२ ला दहा कोटींचा निधी आला.