‘राऊतांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची राज्यसरकारने दखल घेतली नाही’ – चित्रा वाघ

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून भाजपाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल कले आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर वाद सुरूच असन यावर भाजप नेते चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. राऊतांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची राज्यसरकारने दखल घेतली नाही, अशी टीका भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘जाहीरपणे शिवीगाळ करत ‘रोड […]

‘राऊतांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची राज्यसरकारने दखल घेतली नाही’ – चित्रा वाघ

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून भाजपाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल कले आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर वाद सुरूच असन यावर भाजप नेते चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. राऊतांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची राज्यसरकारने दखल घेतली नाही, अशी टीका भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

‘जाहीरपणे शिवीगाळ करत ‘रोड रोमियो’ सारखी भाषा करणाऱ्या सर्वज्ञानी संजय राऊतांवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला. पण अद्याप राज्य सरकारने ना दखल घेतली ना कारवाई करण्याची हिम्मत दाखविली. मविआ सरकारने सर्वज्ञानींना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड अँम्बेसेडर म्हणून तरी जाहीर करावे’, अशी टीका भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत केली आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखतीमध्ये बोलताना भाजपाविरोधात अपशब्द वापरला. तसेच महिलांबाबतही चुकीचे शब्द वापरले. त्यामुळे याप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number