Festival Holiday : सरकारचा जीआर जारी! आता दहीहंडीला नाही, तर रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; तारखा बघून ठेवा

मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी यंदाच्या स्थानिक सुट्टीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने गोपाळकाला अर्थात दहीहंडी सणासाठी यापूर्वी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर केली आहे. स्थानिक सुट्ट्यांमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या सुट्टीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन […]

Festival Holiday : सरकारचा जीआर जारी! आता दहीहंडीला नाही, तर रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; तारखा बघून ठेवा

मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी यंदाच्या स्थानिक सुट्टीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने गोपाळकाला अर्थात दहीहंडी सणासाठी यापूर्वी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर केली आहे. स्थानिक सुट्ट्यांमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या सुट्टीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, 10 ऑगस्ट रोजी शासन शुद्धीपत्रक जारी करून सुधारित निर्णय स्पष्ट केला आहे. 

हेही वाचा : Madhuri Dixit : चाहत्यांना सुखद धक्का! माधुरी दीक्षित करणार 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन; Promo Out

यापूर्वी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला अर्थात दहीहंडीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी रक्षाबंधनाचा सण शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी असल्याने त्या दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील संबंधित शासकीय व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी राहणार आहे. दहीहंडीची सुट्टी रद्द करण्यामागे प्रशासनाने स्थानिक सुट्टयांच्या वेळापत्रकात केलेला बदल कारणीभूत आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी स्थानिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number