दाक्षिणात्य अभिनेत्री २ दशकांनंतर हिंदी सिनेसृष्टीत परतणार

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री ज्योतिका आता तब्बल २५ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. ती अभिनेता अजय देवगण याच्यासोबत एका थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी केली. अभिनेत्री ज्योतिका दोन दशकांनंतर हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या चित्रपटाचे अद्याप नाव समोर आले नसले […]

दाक्षिणात्य अभिनेत्री २ दशकांनंतर हिंदी सिनेसृष्टीत परतणार

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री ज्योतिका आता तब्बल २५ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. ती अभिनेता अजय देवगण याच्यासोबत एका थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी केली.

अभिनेत्री ज्योतिका दोन दशकांनंतर हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या चित्रपटाचे अद्याप नाव समोर आले नसले तर अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन हे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असलयाचे म्हंटले जात आहे.

ज्योतिका 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या लिटिल जॉन या चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यांनतर ती आता २३ वर्षांनी पुन्हा हिंदी चित्रपटात काम करणार आहे. या बाबत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number