लासलगावच्या शिव नदीची झाली कचराकुंडी

निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव नजीक आणि ब्राह्मणगाव विंचूर या तीन गावांच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या शिव नदीची कचराकुंडी झाली आहे. लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजार पेठ असल्याने हॉटेल व्यवसाय जोरात असतो. त्यातील ओला कचरा, भाजीपाल्याचा कचरा, मटण दुकानातील कचरा आणि बाजार तळातील कचरा तसेच प्लास्टिकला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि गटारीं वाटे ड्रेनेजचे पाणी शिव नदी […]

लासलगावच्या शिव नदीची झाली कचराकुंडी

निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव नजीक आणि ब्राह्मणगाव विंचूर या तीन गावांच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या शिव नदीची कचराकुंडी झाली आहे. लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजार पेठ असल्याने हॉटेल व्यवसाय जोरात असतो. त्यातील ओला कचरा, भाजीपाल्याचा कचरा, मटण दुकानातील कचरा आणि बाजार तळातील कचरा तसेच प्लास्टिकला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि गटारीं वाटे ड्रेनेजचे पाणी शिव नदी पात्रात दाखल होत आहे. त्यामुळे, दुर्गंधी पसरली असून तसेच डासांचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये बसणेही नदीकाठच्या भागातील ग्रामस्थांना त्रासदायक झाले आहे. यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, शिवनदी स्वच्छ करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे. मात्र, या निवेदनातील मागण्यांकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number