विधानसभेत आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्षात शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधासभेत बहुमत प्रस्ताव जिंकला.यात मतमोजणीत बहुमत शिंदे सरकारच्या बाजूने लागले आहे.
या निवडणुकीत शिंदे सरकारला १६४ आमदारांचे समर्थन मिळाले या मतमोजणी मध्ये भाजपाचे दोन आमदार आजारपणामुळे अनुपस्थित होते. त्यामुळे
भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले आहेत. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे. या सगळयात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
विधिमंडळाकडून गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता दिली आहे. तर भरत गोगवाले यांची मुख्य सचेतक म्हणून मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधासभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीला अवघी ९९ मते मिळाली.दरम्यान, सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विजयाची घोषणा केली. या चाचणी साठी वडेट्टीवार,चव्हाण मुकले आहेत. बहुमत चाचणी दरम्यान सभागृह १० मिनिटासाठी बंद ठेवण्यात आला होते.