आता २८ दिवसांनंतर घेता येईल लसीकरणाची दुसरी मात्रा

  कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी ‘कोरोना लसीकरण’ करण्याचे आव्हान राज्यसरकारकडून सतत करण्यात येत आहे. राज्यात नागरिकांनी कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. आता कोविशील्ड कोरोना लसीकरणाची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेता येणार आहे.   कोरोना काळात लसीकरणाला विशेष महत्त्व देत नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही मात्रा घेणे […]

आता २८ दिवसांनंतर घेता येईल लसीकरणाची दुसरी मात्रा

  कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी ‘कोरोना लसीकरण’ करण्याचे आव्हान राज्यसरकारकडून सतत करण्यात येत आहे. राज्यात नागरिकांनी कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. आता कोविशील्ड कोरोना लसीकरणाची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेता येणार आहे.

  कोरोना काळात लसीकरणाला विशेष महत्त्व देत नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. कोरोना लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर कोरोना लसीची दुसरी मात्रा घेणे, आवश्यक होते. मात्र, आता मुंबई महापालिकेने या नियमांत बदल केला आहे. कोरोना लसीची दुसरी मात्रा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनी घेण्यात येणार आहे. याबबत महापालिकेने नागरिकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत.

  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे शासकीय आणि खासगी कंपन्या आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, लसीचे दोन्ही मात्रा घेणे काही कंपन्यांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोविशील्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्याची मागणी सतत जोर धरत होती. त्यामुळे या मागणीची दखल घेत, महापालिकेने लसीकरणाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे खासगी, शासकीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना तसेच पर्यटनासह परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना कोविशील्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनी घेण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number