Unknown Story of Frankie | या पदार्थाला फ्रँकी का म्हणतात, त्या मागची रंजक कहाणी ऐकून व्हाल थक्क!

महान क्रिकेटपटूच्या नावावरून पडलंय फ्रँकी हे नाव, जाणून घ्या त्या मागची रंजक कहाणी <br/>

Unknown Story of Frankie | या पदार्थाला फ्रँकी का म्हणतात, त्या मागची रंजक कहाणी ऐकून व्हाल थक्क!

तुम्ही अनेकदा 'फ्रँकी' हा पदार्थ खाल्ला असेल किंवा 'फ्रँकी' या पदार्थाबद्दल ऐकलं असेल. प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की या पदार्थचं नाव फ्रँकी का आहे ? हा पदार्थ बनवणारा पहिला व्यक्ती कोण आहे ? 'फ्रँकी' हे नाव एका क्रिकेटपटूच्या नावावरून  दिलं गेलं आहे. 'फ्रँकी' बनवणारा जो माणूस होता त्याने त्याच्या आवडीच्या क्रिकेटपटूवरून हे नाव त्यांनी दिलं, तर कोण होता हा क्रिकेटपटू आणि कोण होता हा माणूस ज्याने 'फ्रँकी' पदार्थ बनवला याबद्दल जाणून घेऊया. 

हेही वाचा – IPL Team News | 'या' संघांचा IPL 2026 चा प्रवास जवळपास संपुष्टात, IPL 2026 नंतर सामोरं जावं लागणार मोठ्या फेरबदलांना

1969 मध्ये फ्रँकी हा पदार्थ सर्वप्रथम बनवला गेला. 'फ्रँकी' बनवणारे एक पंजाबी दाम्पत्य होतं. अमरजित सिंग टीब आणि त्यांची पत्नी सुरिंदर कौर टीब यांनी हा पदार्थ बनवला. हे दाम्पत्य विदेशात गेले होते, तिथे यांनी लेबनीज पिटा ब्रेड म्हणजेच शोरमा खाल्ला होता. त्यांना शोरमा आवडला पण त्याच वेळी त्यांच्या मनात आलं की असं काहीतरी आपण बनवलं पाहिजे जे भारतीयांना आवडेल. म्हणून त्यांनी अगदी तसाच 'रोल' बनवला पण त्यात भारतीय मसाल्यांचे मिश्रण टाकलं. फ्रँकी बनवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मित्र परिवाराला प्रयोग केलेले पदार्थ खाऊ घातले. त्यांना जेव्हा पदार्थ आवडायला लागला त्यांच्याकडून 'फ्रँकी' होकार आला तेव्हा ते समजले की त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्या अनेक प्रयत्नांनंतर त्यांना 'फ्रँकी' बनवणं जमलं. यानंतर त्यांनी ठरवलं की आपण 'फ्रँकी' विकण्यासाठी एक दुकान सुरू करू आणि त्यांनी त्याला नाव दिलं 'टिब्स'.

हेही वाचा – IPL TOP 4 Criteria : टॉप-4 मध्ये एन्ट्री हवी असल्यास पुढील सर्व सामने जिंकावे लागतील, आयपीएलमधील संघांचं टेन्शन वाढलं 

दुकानाचं नाव ठेवलं पण पदार्थाचं काय ? अमरजित सिंग हे क्रिकेटचे चाहते होते. वेस्ट इंडिजचे सर फ्रॅंक वॉरेल हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू होते. त्यांना प्रेमाने फ्रँकी असं म्हणायचे. तर अमरजित यांनी या पदार्थाचं नाव ठेवलं 'फ्रँकी'. फ्रँकी नाव ठेवण्यामागचा एक हेतू असा होता की फ्रँकी हे नाव आधुनिक वाटत होतं आणि ते प्रौढ माणसांसोबत लहानग्यांनादेखील आकर्षित करेल. पुढे जाऊन त्यांनी फ्रँकी हे नाव 'ट्रेडमार्क' केलं, हे नाव 'टिब्स' शिवाय इतर कोणीही वापरू शकत नाही, परंतु भारतात बनणारे बहुतेक 'रोल' हे फ्रँकी म्हणूनच ओळखले जातात.  

'फ्रँकी' हा पदार्थ सुपरहिट ठरला. या पदार्थाला लोकांची पसंती मिळाली. आजच्या घडीला 'टिब्स'चे 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 300 हून अधिक आउटलेट्स आहेत. आता राहिली गोष्ट सर फ्रॅंक वॉरेल यांची. सर फ्रॅंक वॉरेल वेस्ट इंडीजसाठी 51 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 3860 धावा केल्या. यात नऊ शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी 69 विकेट्सदेखील घेतल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ते 208 सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 15025 धावा केल्या. त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 39 शतकं आणि 80 अर्धशतकं मारली आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या 349 विकेट्सदेखील आहेत.  तिने 15 सामन्यात  वेस्ट इंडीजचे कर्णधारदेखील राहिले आहेत. सर फ्रॅंक वॉरेल उजव्या हाताचे फलंदाज आणि डावखुरे वेगवान गोलदांज होते.
1967 मध्ये  वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number