विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

राज्यातील एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यासाठी विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी संप पूर्णपण मागे घेतलेला नाही तसचे अनेक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, […]

विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

राज्यातील एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यासाठी विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी संप पूर्णपण मागे घेतलेला नाही तसचे अनेक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एसटी महामंडळाचे विलिनीकरणाचा मागणी न्यायालयात पोहचली आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी न्यायालायने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे समिती जो निर्णय घेईल तो सरकारला मान्य असल्याचे राज्यपरिवहन मंत्री अनिल परब यांनी संगितले. तसेच अनिल परब यांनी इतर राज्याच्या परिवहन मंडळाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ केली आहे. तरीही कर्मचारी या निर्णयावर समाधानी नाहीत. अशी टोकाची भूमिका घेणे योग्य नसून कुठलीही गोष्ट तुटेपर्यंत ताणायची नाही. दोन्ही बाजूंनी दोन पावले मागेपूढे होणे गरजेचे असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्यसरकारला कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा विचार करता राज्यातील प्रवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी योग्य विचार करून विषय संपवावा. आणि आंदोलन मागे घ्यावे, असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number