Maha-Mumbai CNG : मुंबईमधील सीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याचे धक्कादायक कारण समोर! महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा खुलासा

वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा बंद झाला. यामुळे मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून CNG पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे.

Maha-Mumbai CNG : मुंबईमधील सीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याचे धक्कादायक कारण समोर! महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा खुलासा

वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा बंद झाला. ज्यामुळे शहरातील सीएनजीच्या उपलब्धतेवर परिणाम झाला. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बससेवा ठप्प झाल्या आहेत. ज्याच्या परिणाम सर्वसामान्यांवर, नोकरदारांवर आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे. कारण रिक्षा, टॅक्सी आणि बसला आवश्यक गॅस उपलब्ध न झाल्याने कोणतीही वाहनसेवा वेळेवर येत नाही, यामुळे सर्वसामान्यांना, नोकरदारांना आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून CNG पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे. यामागचं कारण म्हणजे मेन पाईपलाईनमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून छिद्र पाडण्यात आलं होतं आणि त्याचमुळे ही समस्या ओढवली आहे. आरसीएफ (नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) परिसरात गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या गेल आणि एमजीएल प्रशासन बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान सीएनजी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number