‘बाईपण भारी देवाचं’ खरं नाव ? जाणून घ्या.

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : हिंदी चित्रपटांप्रमाणे सध्या मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या चित्रपट गृहांमध्ये गाजतोय. चित्रपटाच्या कथानकासह याचे शीर्षक देखील तितकेच आकर्षक आहे. परंतू बाईपण भारी देवा हे नाव जरी हटके असलं तरीही सिनेमाच्या सुरुवातीला हे नाव नव्हते. तर या सिनेमाचे […]

‘बाईपण भारी देवाचं’ खरं नाव ? जाणून घ्या.

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : हिंदी चित्रपटांप्रमाणे सध्या मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या चित्रपट गृहांमध्ये गाजतोय. चित्रपटाच्या कथानकासह याचे शीर्षक देखील तितकेच आकर्षक आहे. परंतू बाईपण भारी देवा हे नाव जरी हटके असलं तरीही सिनेमाच्या सुरुवातीला हे नाव नव्हते. तर या सिनेमाचे सुरुवातीला नाव काय होते? जाणून घेऊया :

बाईपण भारी देवा या चित्रपटाचा लेखक ओंकार दत्त याने या सिनेमाच्या नावाबाबत खुलासा केला आहे. बाईपण भारी देवा चा मधील शशी म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जेव्हा पहिल्यांदा स्क्रीप्ट देण्यात आली, त्यावेळचा फोटो ओंकारने पोस्ट केलाय. परंतु या स्क्रीप्टवर बाईपण भारी देवा नाही तर वेगळंच नाव दिसतंय. यावर ‘मंगळागौर’ हे नाव दिसतंय. याचाच अर्थ या चित्रपटाचे नाव सुरुवातीला मंगळागौर असे होते.

सध्या महाराष्ट्रात या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. केवळ आठवड्याभरातच चित्रपटाने साडेबारा कोटींचा गल्ला केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number