Uran Ransai Dam : उरणकरांची पाण्याची चिंता मिटली; अवघ्या पाच दिवसाच्या पावसातच रानसई धरण दुथडी भरून वाहू लागली

उरण : उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण रविवार, 5 जुलै रोजी रात्री एकच्या सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. मागील 5 दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. मागील वर्षीही 18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातून देण्यात आली. […]

Uran Ransai Dam : उरणकरांची पाण्याची चिंता मिटली; अवघ्या पाच दिवसाच्या पावसातच रानसई धरण दुथडी भरून वाहू लागली

उरण : उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण रविवार, 5 जुलै रोजी रात्री एकच्या सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. मागील 5 दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. मागील वर्षीही 18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातून देण्यात आली. मात्र यावर्षी अवघ्या पाच दिवस कोसळणाऱ्या पावसात रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने उरणकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. उरण तालुक्यातील रानसई धरणाची उंची 166 फूट असून 86 फूट ही मूळ साठ्याची पातळी आहे. या धरणातून उरण तालुक्यातील 25 गावे, उरण शहर  आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.

हेही वाचा : Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ, 5 तालुक्यांतील शाळांना सुट्टी

जून महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळी सातत्याने वाढत  चालली होती. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे काल रात्री 1 वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. एकंदरीत रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांनी तसेच तरुणांनी धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number