‘७२ हुरे’च्या निर्मात्याला अखेर दिलासा

मुंबई, ९ जुलै २०२३, प्रतिनिधी : बऱ्याच वादात अडकेलला ७२ हुरे हा सिनेमा ७ जुलैला संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. या सिनेमावर प्रेक्षकांच्या काही संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यायचे मुख्य कारण म्हणजे सिनेमाचा वादग्रस्त विषय,धार्मिक भावना अशा अनेक गोष्टी. अशातच ७२ हुरे च्या निर्मात्याला धमकीचे मेल येत असल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे. ७२ […]

‘७२ हुरे’च्या निर्मात्याला अखेर दिलासा

मुंबई, ९ जुलै २०२३, प्रतिनिधी : बऱ्याच वादात अडकेलला ७२ हुरे हा सिनेमा ७ जुलैला संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. या सिनेमावर प्रेक्षकांच्या काही संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यायचे मुख्य कारण म्हणजे सिनेमाचा वादग्रस्त विषय,धार्मिक भावना अशा अनेक गोष्टी. अशातच ७२ हुरे च्या निर्मात्याला धमकीचे मेल येत असल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे.

७२ हुरे या चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत धमक्या येत आहेत. यासर्व प्रकरणावर अशोक यांनी रीतसर तक्रार दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत अशोक पंडित यांना पोलिसांकडून संरक्षण मिळाले आहे. अलीकडेच त्यांनी याबाबत माहिती देत. आपल्या विनंतीला मान दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह मुंबई पोलिसांचे आभार मानले. त्याचबरोबर ‘दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे,’ असेही ते म्हणाले.

७२ हुरे या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. तर यात अभिनेता आमिर बशीर आणि पवन मल्होत्रा ​​यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number