गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यावेळी बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती.ही गोळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीत निघाली होती असा अहवाल बॅलेस्टिक तज्ज्ञांनी दिला आहे.त्यामुळे सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. सदा सरवणकर यांच्या जवळील बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती. त्यावेळी सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सरवणकरांच्याच बंदुकीत सुटल्याचं समोर आलं आहे. बॅलेस्टिक अहवाल समोर आल्यानंतर पोलीस आता सदा सरवणकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार, ते पाहावे लागेल.
दरम्यान पोलिसांनी गोळीबार प्रकरणी तपास करत असताना घटनास्थळावरुन काडतूसं आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते.बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, जप्त केलेली काडतूसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली.दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात १५ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.