मंगळवारी सकाळी ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बिघाडाचा फटका राज्यपालांच्या कार्यक्रमाला बसला आहे.
वीज पुरवठा खंडित झालेल्या परिसरात आज स्काऊट्स आणि गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते हा पुरस्कार समारंभ होत होता. मात्र, या कार्यक्रात वीज पुरवठा खंडित झाला. पडघा येथील महापारेषणच्या ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे ठाणे, अंबरनाथ, बदालपुर तसेच मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, दुरूस्ती करून साधरणात: अर्ध्यातासाने वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती समोर आली.