आगामी निवडणुकांवर भाजपाच्या रणनितीची शक्यता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आव्हानाला तोंड कसे देणार यावर चर्चेला सुरवात झालेली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात होत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात संघटनेमध्ये काय कामे केली पाहिजेत, नागरिकांपर्यंत कसे पोचायचे, विरोधकांवर मात कशी करावी यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा […]

आगामी निवडणुकांवर भाजपाच्या रणनितीची शक्यता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आव्हानाला तोंड कसे देणार यावर चर्चेला सुरवात झालेली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात होत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात संघटनेमध्ये काय कामे केली पाहिजेत, नागरिकांपर्यंत कसे पोचायचे, विरोधकांवर मात कशी करावी यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपच्या या प्रदेश कार्यकारिणीमध्ये १२०० पेक्षा जास्त सदस्य, सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे ही बैठक होणार असून, नड्डा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत, मोदी सरकारच्या या काळातील योजना घरोघरी पोचविण्यासाठी संपर्क अभियानाची घोषणा केली जाणार आहे. तसेच राजकीय प्रस्ताव, संघटनात्मक ठरावही या कार्यकारिणीच्या बैठकीत पारीत केले जाणार आहेत. राज्यातील सध्याच्या स्थितीवर पक्षाकडून बैठकीमध्ये काय ठराव मांडले जातील याकडेही लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number