Nashik News : चांदवड-लासलगाव रोडवर फिल्मी स्टाईल पाठलाग; 32 किलो गांजासह स्विफ्ट कार जप्त, तिघांना अटक

​चांदवड : चांदवड – लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या धडाकेबाज कारवाईत 32 किलो गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH-01-BT-8813) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड-लासलगाव रस्त्यावरून स्विफ्ट कारमधून अमली पदार्थाची […]

Nashik News : चांदवड-लासलगाव रोडवर फिल्मी स्टाईल पाठलाग; 32 किलो गांजासह स्विफ्ट कार जप्त, तिघांना अटक

​चांदवड : चांदवड – लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या धडाकेबाज कारवाईत 32 किलो गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH-01-BT-8813) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड-लासलगाव रस्त्यावरून स्विफ्ट कारमधून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने या मार्गावर सापळा रचला. संशयास्पद कार येताच पोलिसांनी तिला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून कारची कोंडी केली. कारची झडती घेतली असता त्यात 32 किलो गांजा आढळून आला. यात 14,74,300 रुपयांचा मुद्देमालासह यात पोलिसांनी गांजा, कार आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले असून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ratnagiri: हृदय पिळवटून टाकणारी घटना! दीड वर्षांच्या मुलासह धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून जोडप्याची उडी; महिलेचा जागीच मृत्यू

​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे तसेच पोलीस हवालदार संतोष दोंदे, विश्वनाथ धाडबळे, प्रवीण गांगुर्डे, सतीश जगताप, सतीश घुटे, किशोर बोडके आणि रवींद्र गवळी यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number