देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आणखी वेगवान होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना संक्रमणाचा वेग वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ११ जून ते १७ जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात ०४ जून २०२२ ते १० जून २०२२ या दरम्यान ४० हजार ८८८ रुग्ण होते. हा आकडा ११ जून २०२२ ते १७ जून २०२२ या दरम्यान ७० हजार ३५८ वर पोहोचला. यामुळे आधीच्या आठवड्याच्या तुलनेत गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत ७२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. गेल्या ३,८८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात २८०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८५ टक्के एवढे आहे. तर गेल्या २४ तासात एकूण २,८०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण दोन कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आज एकूण २२,८२८ सक्रिय रुग्ण संख्या आहे.