पहिल्या बैलगाडी शर्यतीसाठी सांगलीतले नांगोळे सज्ज

राज्यातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. यानंतर राज्यसरकारने बैलगाडा शर्यतीवरली बंदी उठवली आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन राज्यातील पहिलीच बैलगाडी शर्यत कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे गावांमध्ये आज होत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैलगाडा शर्यत घेण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी कोरोना नियम, अटी पाळून शर्यत घेण्यासाठी परवानगी दिली […]

पहिल्या बैलगाडी शर्यतीसाठी सांगलीतले नांगोळे सज्ज

राज्यातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. यानंतर राज्यसरकारने बैलगाडा शर्यतीवरली बंदी उठवली आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन राज्यातील पहिलीच बैलगाडी शर्यत कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे गावांमध्ये आज होत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैलगाडा शर्यत घेण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी कोरोना नियम, अटी पाळून शर्यत घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या शर्यतीसाठी २६ नियम देण्यात आले आहेत. या नियमांच्या आधारवर शर्यत घेण्यात येणार असल्याचे बैलगाडा स्पर्धा संयोजक संदीप गिड्डे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाचे नियमांतर्गत गावामध्ये विनामास्क शर्यत पाहण्यास येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर नियमानुसार फक्त पन्नास प्रेक्षकांना गावांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. या निर्णयांनंतर राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली. या निर्णयानंतर बैलगाडा मालकांनी आनंद व्यक्त केला. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number