आईनेच केली चिमुकलीची हत्या

शहरात काल एक मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली होती. एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले होते. या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. या महिन्याच्या चिमुकलीचा आपल्या जन्मदात्या आईनेच घरातील सुरीने गळा चिरून […]

आईनेच केली चिमुकलीची हत्या

शहरात काल एक मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली होती. एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले होते. या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. या महिन्याच्या चिमुकलीचा आपल्या जन्मदात्या आईनेच घरातील सुरीने गळा चिरून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित युक्ता भूषण रोकडे या महिलेला अटक केली आहे.

जन्मदात्या आईने हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. बाळ वडिलांसारखे दिसत असल्याचे नातेवाईक सतत बोलायचे. तसेच पती आणि सासूकडे बाळ जास्त खेळायचे. तिचे सासू, सासरे, दीर यांच्याकडून सातत्याने ध्रुवांशी भूषण रोकडे यांच्यासारखी दिसते, त्यांचेच अनुकरण करते. युक्ताचे अनुकरण करत नाही. त्यामुळे ध्रुवांशीची आई युक्ताच्या मनात ध्रुवांशी बद्दल राग निर्माण झाला आणि त्या रागातून आईने हे पाऊल उचललं. सोमवारी रात्री सासू आणि दीर घराबाहेर गेले असताना आईने झोपलेल्या ध्रुवांशीचा सुरीने गळा कापला. त्यानंतर सुरी धुवून जागेवर ठेवून दिली. त्यानंतर एका महिलेने तोंडाला रुमाल लावत बेशुद्ध केले आणि बाळाची हत्या केल्याचा बनाव आईने रचल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

युक्ताच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांनी युक्ताला घडलेला प्रसंग वारंवार विचारून कसून चौकशी केल्याने अखेर तिनेच घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी हत्या झालेली ध्रुवांशी रोकडे हिच्या आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number