गेले तीन महिने आम्ही तणावा खाली जगलोय.आज या काव्य राऊतला डीचार्ज मिळतोय त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ समाधान आहे. अशी भावना काव्य राऊत चे आईवडील व्यक्त करत आहेत.
या शस्त्रक्रियेसाठी जवळपास २० लाख रुपये खर्च आला. काव्यच्या आईवडीलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने डाॅक्टरांसमोर देखील हे मोठे आव्हान होते.
आर्थिक बाजू उचलण्यासाठी चिल्ड्रेन्स हेल्प फाउंडेशन ही संस्था पुढे आली आणि डाॅक्टरांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली. या संस्थेने सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली तसेच या पुढची आर्थिक सुद्धा ही संस्था उचलणार आहे.