मुंबईच्या वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवण्याच्या दिशेने मोठी पाऊलवाट उघडली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्तन–विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देत प्रकल्पाला गती दिली असून, या निर्णयामुळे सुमारे 120 किमी लांबीच्या प्रस्तावित किनारी कॉरिडोरचा महत्त्वाचा पाया रचला जाणार आहे.
मुंबई ते विरारदरम्यान जलद, सुरक्षित आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणारा हा सागरी सेतू क्षेत्रातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.उत्तन–विरार सागरी सेतू हा सागरी किनारा मार्ग, सागरी सेतू आणि दृतगती मार्गा यांना एकत्र जोडून वेगवान वाहतुकीचा मार्ग मोकळा करणार आहे.
यामध्ये सागरी किनारा मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, अटल सेतू, ऑरेंज गेट टनल, वर्सोवा–वांद्रे सी लिंक, नॉर्थ कोस्टल रोड, दिल्ली–मुंबई एक्स्प्रेसवे आणि शिवडी-वर्ळी उड्डाणपुलाचा समावेश आहे. तसेच दक्षिण मुंबईला वसई, विरार, पालघर आणि नवीन बांधण्यात येत असलेल्या वाढवण बंदराशी दृतगती महामार्गाने जोडले जाणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण होण्यासाठी 60 महिने लागणार असून या प्रकल्पाला एकुण 58,754.71 कोटी इतका खर्च होऊ शकतो. तसेच राज्य सरकार 11,116.27 कोटींची आर्थिक तरतूद ज्यात कर, जमीन संपादन आणि पुनर्वसनाचा खर्च यांचा समावेश असणार असल्याची मदत करून देणार आहे. हा प्रकल्प MMRDA मार्फत राबवला जाईल.
24.35 किमी लांबीचा उत्तन–विरार सागरी सेतू भारतातील सर्वात लांब सागरी पूल असून 30.77 किमीच्या टप्प्याची एकूण लांबी 55.12 किमी असेल. वाढवण बंदराचा विस्तार मुंबईतील उत्तर-दक्षिण जोडणी सुधारेल आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल.