मणिपूरच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मात्र आज मणिपूर येथील महिलांवर झालेल्या आत्याचाराचे पडसाद महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. यासंदर्भातचर्चेची मागणी करत विरोधी पक्षातील महिला आमदारांनी विधानसभेच्या सभागृहात आक्रमक होत या घटनेचा निषेध नोंदवला. त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. […]

मणिपूरच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मात्र आज मणिपूर येथील महिलांवर झालेल्या आत्याचाराचे पडसाद महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. यासंदर्भातचर्चेची मागणी करत विरोधी पक्षातील महिला आमदारांनी विधानसभेच्या सभागृहात आक्रमक होत या घटनेचा निषेध नोंदवला. त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

मणिपूर मध्ये महिलेवर झालेल्या अन्याया विरोधात विधानसभेत प्रस्ताव मांडला पाहिजे, असे म्हणत यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड सभागृहात आक्रमक झाल्या. त्यावर ‘मी नाकारले नाही, आपल्याकडे नियम आहेत. तुम्ही प्रस्ताव मांडा मग बघू… तुम्ही प्रस्ताव मांडणार नाही आणि चर्चा मागणार असे होणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. विधानसभा अध्यक्षांच्या या विधानावर महिला आमदार आणखीनच भडकल्या आणि सभात्याग केला.

मणिपूरच्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. भविष्यातही अशा दुर्देवी घटनांचा आम्ही विरोध करतच राहू. भारता सारख्या देशात अशा पद्धतीने महिलांचा अपमान केला जातो आणि पंतप्रधान ७९ दिवसानंतर त्यावर भाष्य करतात हे दुर्देवी आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

‘ही घटना लज्जास्पद आहे. फक्त मणिपूरचाच विषय नाही, तर जगातल्या भारताच्या प्रतिमेचा विषय आहे, या प्रकरणावर मोदी सुद्धा संसदेत बोलायला तयार नाहीत, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. तर खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पद्धतीने मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचे मत वर्षा गायकवाड यांनी मांडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number