Maharashtra Heat Wave : मान्सून लांबणीवर! मुंबई – ठाण्यासह उत्तर कोकणातही तीव्र उष्णतेचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड अलर्ड जारी

मुंबई : राज्यातील नागरिक आतुरतेने मान्सूनची वाट पाहत असताना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजते. तर मुंबई ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.  मुंबई ठाण्यात आजही तीव्र उष्णतेच्या लाटा वाहणार असल्याचे समजते. तसेच उत्तर कोकणाला उन्हाचा तडाखा बसणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांपासून तापमानाचा […]

Maharashtra Heat Wave : मान्सून लांबणीवर! मुंबई – ठाण्यासह उत्तर कोकणातही तीव्र उष्णतेचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड अलर्ड जारी

मुंबई : राज्यातील नागरिक आतुरतेने मान्सूनची वाट पाहत असताना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजते. तर मुंबई ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.  मुंबई ठाण्यात आजही तीव्र उष्णतेच्या लाटा वाहणार असल्याचे समजते. तसेच उत्तर कोकणाला उन्हाचा तडाखा बसणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 अंशावर गेला होता. केरळ येथे अद्यापही मोसमी वारे दखल झाले नसून पावसासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची वाट पाहावी लागणार आहे. कोकण प्रदेशात उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे 26 मे च्या सुमारास केरळमध्ये धडकतील अशी शक्यता आयएमडीने वर्तवण्यात आली होती. मात्र मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात काहीशी रेंगाळली आहे. मान्सून अजूनही श्रीलंकेच्या हद्दीतच स्थिरावला आहे.

हेही वाचा : Milind Narvekar : फडणवीस आणि ठाकरे गटाचा वाढता समन्वय, नार्वेकरांचा एक फोन आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शिंदे गटाला झटका

विदर्भ प्रचंड उष्णतेने होरपळतोय

मान्सून रेंगाळला असला तरी महाराष्ट्रात पुढील 5 दिवस कमालीचे हवामान पाहायला मिळणार आहे. एका बाजूला विदर्भ तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असताना, दुसरीकडे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत पुढील 3 दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर लातूर जिल्ह्यात पुढील 4 दिवस आणि धाराशिव जिल्ह्यात सलग 5 दिवस पावसासाठी पोषक हवामान राहील, असे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. 

भंडारा जिल्ह्याचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार

सध्या मे महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून भंडारा जिल्ह्याचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अशा अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात नागरिकांना पाण्याचा मोठा आधार लागत असतानाच, तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

तर नागपूरमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे मृत्यू उष्माघाताचे झाल्याचा संशय वर्तवला जात आहे. मृतकांमध्ये भिक्षेकऱ्यांसह तीन रेल्वे प्रवाशांचाही समावेश आहे. डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. बुधवारी कमाल तापमानात वाढ होऊन नागपूरचा पारा 45.7 अंशांवर पोहोचला. विदर्भावर सूर्य आकाशातून आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आजही नागपूरसह विदर्भाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number