‘भाजपा राष्ट्रवादी फोडेल याची कल्पना होती’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाने एका पक्षातच आता दोन गट तयार झाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने प्रमाणेच आता राष्ट्रवादीत देखील उभी फूट पडली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावरून सध्या राष्ट्रवादीत पेच निर्माण झाला आहे. यावरूनच रोहित […]

‘भाजपा राष्ट्रवादी फोडेल याची कल्पना होती’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाने एका पक्षातच आता दोन गट तयार झाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने प्रमाणेच आता राष्ट्रवादीत देखील उभी फूट पडली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

यावरून सध्या राष्ट्रवादीत पेच निर्माण झाला आहे. यावरूनच रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करताना याबाबत कल्पना होती असं म्हटलं आहे. तर भाजपकडून राष्ट्रवादी फोडण्याबाबत गेले काही दिवस प्रयत्न सुरू होते. मात्र अजित पवारच त्यांच्याबरोबर जातील असे वाटलं नव्हतं असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर यावेळी भाजपावर निशाणा साधत त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोनच पक्ष भाजपला टक्कर देऊ शकतात हे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यातील नेत्यांना चांगलंच माहित होतं. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number