उन्हाच्या झळा शाळेला बसणार

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरणार असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत या शाळा सुरू राहणार आहेत. बारा वाजता सर्व शाळा सोडण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत . सकाळच्या सत्रात जरी या शाळा भरवल्या जात असतील तरीही […]

उन्हाच्या झळा शाळेला बसणार

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरणार असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत या शाळा सुरू राहणार आहेत. बारा वाजता सर्व शाळा सोडण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत . सकाळच्या सत्रात जरी या शाळा भरवल्या जात असतील तरीही आठ तासिका घेण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

याआधी हिंगोलीत जिल्हा परिषद शाळा सकाळी ९:३० ते दुपारी ४ या वेळेत भरत होत्या. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांत हिंगोली जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत शाळा भरवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने काल मंगळवारी सर्व शाळांना दिले. तसंच दुपारी कोणताही वर्ग भरवू नये असंही सांगण्यात आलं आहे. या निर्णयानुसार गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय निश्चितच चांगला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number