मुंबईत कोरोनाचे कापा आणि एक्सई असे दोन नवीन विषाणू आढळले असल्याचा दावा बृहन्मुंबई महानगर पालिकेने केला होता. मात्र, मुंबईत कोरोनाचा एकही नवीन प्रकार नाही, असे स्पष्टीकरण देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई महापालिकेचा दावा फेटाळला आहे.
मुंबईत कोरोनाचा एकही नवा प्रकार नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगतिले होते की, मुंबईत कोरोनाचे कापा आणि एक्सई उपप्रकाराचे रुग्ण सापडले आहेत. मुंबईत एकूण २३० नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे २२८ रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण कापा उपप्रकाराने तर अन्य एक रुग्ण एक्सई उपप्रकाराने बाधित आहे. मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दावा फेटाळला आहे. मुंबईत कोरोनाचा एकही नवा प्रकार नसल्याचे आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.