Pune Ganpati Visarjan Miravnuk 2025 : ढोलताशाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; पालखीत बाप्पा विराजमान

राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून पुण्यातील मानाच्या गणरायाची मिरवणूकदेखील निघाली आहे.

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2025 : ढोलताशाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; पालखीत बाप्पा विराजमान

पुणे : राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून पुण्यातील मानाच्या गणरायाची मिरवणूकदेखील निघाली आहे. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हे पुण्यातील पाच मानाचे गणपती असून आज सकाळी त्यांनी आरती झाल्यानंतर त्यांच्या मंडळाच्या वतीने मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असून पालखीतून या मानाच्या गणरायाची मिरवणूक काढली जात आहे. कुठे हत्तीचा समावेश, कुठे फुलांची पालखी, कुठे ढोलताशाचा गजर अशा थाटात बाप्पाची मिरवणूक काढली जात आहे. 

हेही वाचा : Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनावेळी पुण्यातील मुख्य रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरभर गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मोठी गर्दी अपेक्षित आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुणे शहर वाहतूक विभागाने महत्त्वाचे रस्ते बंद करण्यासोबतच पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे. शनिवारी सकाळपासून मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरू होणार असल्याने मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड यांसारखे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. दुपारनंतर कुमठेकर रोड, शास्त्री रोड, बाजीराव रोड यांवर वाहनांची हालचाल थांबवली जाणार आहे. सायंकाळी जे एम रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रोडसह पुणे सातारा रोड व पुणे सोलापूर रोडवरही बंदी असेल.

हेही वाचा : Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नीसह केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अनंत चतुर्थीची पूजा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number