26 एप्रिल रोजी मुंबईच्या पायधुनी परिसरात जेवणात बिर्याणी खाल्यानंतर कलिंगड खाल्लेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ या घटनेचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला. या घटनेनंतर आस-पासच्या परिसरातील फळविक्रेते आणि कलिंगड विक्रेत्यांची नसून चौकशी केल्यानंतर कलिंगड खाल्यामुळे हे मृत्यू न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपास सुरू केल्यानंतर तापासाद्वारे धक्कादायक बाब समजली आहे. तसेच हा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने झाली नसून मृत कुटुंब डोकाडिया यांच्या शरीरात पोस्टमॉर्टेमदरम्यान “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामक) हा पदार्थ आढळल्याने झाली असल्याची शक्यता वर्तावण्यात आली.
दरम्यान सुरुवातीला मृत कुटुंब डोकाडिया यांच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, पाणी, शिजवलेले चिकन आणि खजूर असे एकूण 11 नमुने जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता जो प्राथमिक फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे, त्याने तपास करणाऱ्या पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे मृतांचे शरीर देखील हिरवं पडलं. अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन हा वेदनाशामक पदार्थ आढळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवीन खुलास्यामुळे चौघांच्या मृत्यूला घेऊन संशय आणखीन बळावला आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ चांगलंच वाढलं असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अजूनही तसाच आहे.
मॉर्फिन म्हणजे काय?
मॉर्फिन हे अफूच्या झाडापासून तयार केलेले 'ओपिओइड'किंवा 'नार्कोटिक' औषधांच्या वर्गात येणारे वेदना शामक औषध आहे. या औषधाचा वापर मेंदूतील तीव्र वेदना कमी करण्यासाठी केला जातो.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबाने 25 एप्रिल रोजी रात्री जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून कलिंगड देखील खाल्ले होते. मात्र जेवणानंतर कलिंगड खाल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 एप्रिल रोजी विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 13 आणि 16 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.
मृत व्यक्तींची नावं ही अब्दुल्ला डोकाडिया वयवर्षे 40, नसरीन डोकाडिया वयवर्षे 35 आणि त्यांच्या मुली आयशा वयवर्षे 16 व झैनब वयवर्षे 13 अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जेवणात बिर्याणी खाल्यानंतर अवघ्या काही वेळातच कलिंगड खाल्यानंतर त्यांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.