तब्बल दोन महिने बंद असणारी मासे मारी मंगळवारी १ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. पावसाळ्यात खवळलेला समुद्र साधारणतः २ महिन्यांच्या कालावधी नंतर तो शांत होतो. नारळी पौर्णिमे नंतर मासे मारी साठी पोषक वातावरण असून मच्छिमारांमध्ये उतसाहाचे वातावरण दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, मालवण , देवगड व विजयदुर्ग या तालुक्यातील प्रमुख बंदरात मासेमारीला सुरुवात झाली आहे. बोटींची डागडुजी करणे, रंगरंगोटी करणे या सगळ्या कामांना आता वेग आला असून सर्वच बंदरावर मच्छिमारांची लगबग सुरु झालेली दिसते.
समुद्रातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यंत पर्शियन नेट वापरून मासेमारी केली जाते. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमई, शिंगला, तुणा, हलवा, तांब, पाखट यांसारखी समुद्राच्या भूपृष्ठावरील तरंगती मासळी पकडली जाते. याआधी पर्सियन नेट फिशिंग १५ ते २० वाव खोल समुद्रापर्यंत केली जात होती. मात्र समुद्र किनाऱ्यावरील वाढत्या प्रदूषणामुळे १५ ते २० वाव खोलीपर्यंत मासळी सध्या मिळेनाशी झाली आहे. परिणामी पर्सियन नेटने मासेमारीसाठी ३५ ते ५० वाव खोल समुद्रात जावे लागते.
पारंपारिक पद्धतीने प्रथम होडीचे व सागराचे पूजन करून मच्छीमार बांधवांनी आपल्या होड्या मासेमारीसाठी समुद्रात लोटल्या. जिल्ह्यात चार ते पाच पारपारिक होड्या आहेत आजपासून खऱ्या अर्थाने मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी सुरमई, बागडा व फ्राँस मासे मच्छीमार याना मिळत आहेत सद्या अधिक श्रावण मास सुरू असला तरी मासे खवय्याना आज पासून मच्छी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.