‘भ्रष्टाचारविरोधात लढा सुरूच राहील’ – किरीट सोमय्या

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्रावर गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट केली की, २०१७मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्रा.डॉ. […]

‘भ्रष्टाचारविरोधात लढा सुरूच राहील’ – किरीट सोमय्या

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्रावर गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केली की, २०१७मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्रा.डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भात आरोप करत मानहानी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता त्यांनी नील सोमय्याचे नाव घेतले आहे.

तसेच पुढील ट्विटमध्ये ते म्हणाले, मला त्यांची परिस्थिती समजत आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नसून कोविड सेंटर घोटाळ्याला ठाकरे आणि राऊत प्रतिसाद का देत नाहीत? असा सवाल उपस्थित करत भाजपचा भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number